//Marathi Departmental Activities

Marathi Departmental Activities

  1. 2019-20

दिनांक १ जानेवारी रोजी ‘ सावित्रीबाई फुले आणि मराठी साहित्य ’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.  या परिसंवादात डॉ.सुनंदा वाघ,डॉ.सुजाता पाटील ,डॉ.संध्या सरदार प्रा.आशा लांडगे यांनी अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली.

  1. 2020-21

व्याख्यानांचे आयोजन –१. दिनांक १५ ऑक्टोबर२०२० रोजी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रा. नारायण पाटील यांनी ‘ संस्कृतीची जोपासना ’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान दिले. त्याचा लाभ ९५ विद्यार्थ्यांनी घेतला.

२. दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये सेवक संचालक मा. प्रा. नानासाहेब दाते ,प्राचार्य डॉ, एस.एस. काळे, प्रा.व्ही एस. सोनवणे यांनी ‘सावित्रीबाई फुले यांचे चरित्र, जीवन कार्य आणि शैक्षणिक कार्य’ याबाबत आपले विचार मांडले.

. दिनांक २१/१/२०२१ रोजी ‘कसे बोलावे’ या विषयावर प्रा. आशा लांडगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

४. दिनांक २२ /१/२०२१ रोजी ‘लेखन एक कला’ या विषयावर प्रा. जयश्री पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

५. दिनांक २३/१/२०२१ रोजी ‘वाचन संस्कृती’ या विषयावर प्रा.डॉ.प्रकाश शेवाळे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले.त्यात ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

६. दिनांक २४/१/२०२१ रोजी प्रा. डॉ. गीतांजली चिने यांचे ‘भाषा संवर्धनाची गरज’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.त्यात ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

७. दिनांक २५/१/२०२१ रोजी प्रा.जयश्री बागुल यांचे ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यात ८३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

८. दिनांक २८ /१/२०२१ रोजी ‘मराठी साहित्यातील नऊ रस’ याविषयावर प्रा. राजाराम मुंगसे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

  1. 2021-22

कार्यशाळेचे आयोजन – दिनांक २९ /९/२०२१  रोजी तृतीय वर्ष कला सामान्यस्तर या वर्गासाठी ‘आधुनिक मराठी साहित्य प्रकार : प्रवासवर्णन’ या विषयांतर्गत ‘तीन मुलांचे चार दिवस’- आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेळके यांनी लिहिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित क्रमिक पुस्तकावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात म. प्रो. दिलीप पवार यांनी ‘प्रवासवर्णन: तात्विक अभ्यास’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. तर प्रो. शिरीष लांडगे यांनी ‘तीन मुलांचे चार दिवस’ या प्रवासवर्णनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.

 

व्याख्यानाचे आयोजन – १. दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सुप्रसिध्द गझलकार व कवी  श्री. संतोष वाटपाडे यांचे ‘मराठी गझल आणि सादरीकरण’ व्याख्यान आयोजित करण्यात आले.यात त्यांनी काही गझलांचे सादरीकरण केले.

२. दिनांक १९ /२/२०२२ रोजी डॉ.उषा सोरते यांचे ‘बोली भाषेचे महत्व’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान  आयोजित करण्यात आले.

३. दिनांक २०/२/२०२२ रोजी प्रो.डॉ. विष्णू राठोड यांचे ‘मराठी भाषेचे महत्व’ याविषयावर ऑनलाईन व्याख्यान  आयोजित करण्यात आले.

  1. 2022-23

१. व्याख्यानाचे आयोजन – दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. त्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी.दरेकर,प्रा.आशा लांडगे यांनी व्याख्याने दिली.

२. परिसंवाद : दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी ‘सत्यशोधक समाज आणि मराठी साहित्य’ या विषयावर  परिसंवाद आयोजित करण्यात आला. यात मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी व त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.भास्कर ढोके,मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी व समाजशास्त्र महाविद्यालय,नाशिक चे प्राचार्य डॉ.विलासराव देशमुख ,के.टी.एच.एम.महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रो.डॉ.सुरेश जाधव यांनी आपल्या विषयाच्या अनुषंगाने विषयाची मांडणी केली.

  1. 2023-24

– दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. त्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.गडाख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात प्रा.गंगा गवळी यांनी प्रमुख वक्ते म्हणून  व्याख्यान दिले.त्याचप्रमाणे डॉ.नारायण पाटील, प्रा.जयश्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. विठ्ठल गावलेयांनी केले. तर आभार डॉ.उषा सोरते यांनी मानले.

दिनांक२७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. यात प्रा.डॉ.नारायण पाटील  यांनी प्रमुख वक्ते म्हणून  व्याख्यान दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. गडाख होते.त्याचप्रमाणे प्रा.जयश्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.उषा सोरते यांनी केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. विठ्ठल गावले यांनी केले. तर आभार प्रा. विनोद पवार यांनी मानले.

दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित उत्सव सोहळ्यात  प्रा.विनोद पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.गडाख होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नारायण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.ए.टी.टर्ले यांनी केले.तर आभार प्रा.एस.के.आवारे यांनी मानले.  महाविद्यालयात या कालावधीत झालेल्या विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन मराठी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले.